पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांच्या सुरात सूर मिसळत 'वंदे मातरम्' हे गाणं गायलं. जवानांसोबत देशभक्तीपर गाणं गात जवानांचा उत्साह वाढवला. याचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी कारगिल येथे संबोधित केलं. सैनिक हे माझं कुटुंब आहेत, असं ते म्हणाले.