देशातील कोरोना संसर्गात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा पाच हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही संख्या काल चार हजारांच्या खाली पोहोचली होती. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी मंगळवारी 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तुलनेनं कोरोना रुग्णांच्या संख्येत 739 रुग्णांची घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 45 हजार 746 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.1 टक्के आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत एकूण 215 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 19 लाख 25 हजार 881 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 98.71 टक्के आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 1.44 टक्के आहे. देशभरात मंगळवारी दिवसभरात 3 लाख 55 हजार 231 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.