एकीकडे देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे.

आज गणपती विसर्जनाचा उत्साह आहे. तर दुसरीकडे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे.

देशात गुरुवारी दिवसभरात 6093 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांचा मृत्यू आहे.

त्याआधी बुधवारी दिवसभरात 6395 नवे कोरोनाबाधित आढळले होते. यामध्ये 302 रुग्णांची घट झाल्याचं दिसत आहे.

देशात मागील 24 तासांत 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात 5 लाख 28 हजारा 121 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे जीव गमावला आहे.

दिवसभरात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही एक दिलासादायक बाब आहे.

गेल्या 24 तासांत देशात 6 हजार 768 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.

देशातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्यी देखील कमी झाली आहे. सध्या देशात 49 हजार 636 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर 1.93 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.7 टक्के आहे.