देशातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांसह कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्येही घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 5 हजार 76 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 47 हजार 945 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात देशात 11 कोरोनाबाधितांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्ण आणि मृत्य झालेल्या रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. देशात शुक्रवारी 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 5076 नवीन रुग्णांची नोंद आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांमध्ये 478 रुग्णांची घट झाली असून बळींची संख्याही सात अंकांनी कमी झाली आहे. देशातील कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे. सक्रिय रुग्णांसह मृत्यूचं प्रमाणही घटलं आहे. गेल्या 24 तासांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 5 लाख 28 हजार 150 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के आहे.