देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. यानंतर काही दिवसांनंतरच नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर चांगली बातमी समोर आली आहे.
देशातील कोरोनाचा आलेख घसरला आहे. गेल्या 24 तासांत 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णसंख्येत 539 रुग्णांची घट झाली आहे. तर कोरोनाबळीही घटले आहेत.
देशात गुरुवारी दिवसभरात 6093 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.
त्यामुळेच यंदा दोन वर्षानंतर मोठ्या थाटामाटात पार पडला. कोरोनाचा आलेख असाच घटता राहिल्यास यंदाचा नवरात्रौत्सवही उत्साहात पार पडण्याची शक्यता आहे.
देशात शुक्रवारी दिवसभरात 6 हजार 322 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 139 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावले आहेत.