देशातील कोरोना संसर्गामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे.


सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्णांची संख्या घडली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे.


देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.


देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.


त्याआधी 24 सप्टेंबरला देशात 4 हजार 912 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 81 रुग्णांनी कमी झाली आहे.


देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत.


देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.


देशात सध्या 43 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी शुक्रवारी ही संख्या 44 हजारांवर होती. तर त्याआधी गुरुवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 45 हजारांवर होती.


सध्या देशात 43 हजार 994 सक्रिय रुग्ण आहेत.


देशात एकूण 5 लाख 28 हजार 510 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.