सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 129 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 2.51 टक्के आहे. आधीच्या दिवशी म्हणजे शनिवारी दिवसभरात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. एका दिवसात 648 रुग्णांची घट झाली आहे. ही दिलासादायक बातमी आहे. कारण कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रादुर्भावामुळे सणांवरचे निर्बंध हटले आहेत. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून मुक्त होत उत्साहात सण साजरे केले जात आहेत. देशात सध्या 43 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहेत.