देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट झालेली पाहायला मिळत आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 396 नवीन रुग्ण आढळले असून 201 जणांचा मृत्यू झाला आहे काल 6 हजार 561 प्रकरणे आणि 142 मृत्यूची नोंद झाली म्हणजेच कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांची कमी नोंद झाली आहे गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजार 450 लोक बरे झाले होते सक्रिय रुग्णांची संख्या 69 हजार 897 वर आली आहे त्याचबरोबर या कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 14 हजार 589 झाली आहे