केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 44 हजार 436 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. इतकंच नाही तर देशातील नवीन कोरोना रुग्णांचा आलेखही घसरला आहे. गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 912 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या पाच हजारांच्या पुढे होती. आदल्या दिवशी देशात 5 हजार 383 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज तुलनेनं 441 रुग्ण घटले आहेत. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात लसीकरणाचा मोठा सहभाग आहे. कोरोना संसर्गाचा आलेख जरी घसरताना दिसत असला तरी कोरोनाबींची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल हा आकडा 20 वर होता. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 487 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी 611 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे, तर दोन बाधितांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 687 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.