देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा घटला आहे.

देशात 5383 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या आधीच्या दिवसापेक्षा 60 अंकांनी कमी आहे.

ही दिलासादायक बातमी आहे. कारण अवघ्या काही दिवसांवर नवरात्री आणि त्यानंतर दिवाळी आहे.

कोरोनाचा आलेख घटताना दिसतोय. त्यामुळे यंदा सण आणि उत्सव जोरदार उत्साहात साजरे होत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे.

देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 217 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 383 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.

गुरुवारी दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 45 हजार 281 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या 1,061 ने घटली आहे. काल देशात 46 हजार 342 उपचाराधीन कोरोना रुग्ण होते.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 5 लाख 28 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.