आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी वाढली आहे. गेल्या 24 तासांत 279 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, एकही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 4,46,72,347 वर पोहोचली आहे. देशात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या चार हजार 855 वर पोहोचली आहे. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे. चीन, जपान, ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं दिसत आहे. चीनमध्ये रविवारी एका दिवसात 40 हजार रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र जनतेकडून लॉकडाऊनला विरोध करण्यात येत आहे.