जगभरात पसरलेल्या कोरोना रूग्णाचा वेग भारतात सध्या मंदावला आहे.

जगभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय.

मात्र, भारतासाठी सकारात्मक बाब म्हणजे कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा वेग कमी झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 215 नवीन कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळले आहेत. काल ही संख्या 293 इतकी होती.

एप्रिल 2020 पासून सर्वात कमी कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी तसेच भारतासाठी ही सकारात्मक बाब आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही कोविड-19 ची संख्या 4,46,72,068 वर पोहोचली आहे.

ज्याप्रमाणे कोरोना रूग्णांची संख्या कमी होतेय. त्याचप्रमाणे कोरोनामुळे एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला नाही.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा रिकव्हरी रेट 98.3 टक्के आहे.