देशात आजही कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे



गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे एक हजार 761 नवीन रुग्ण आढळले असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे



काल 2 हजार 75 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे



देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 7 हजार 841 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत



शनिवारी दिवसभरात देशात 3 हजार 196 लोक कोरोनातून बरे झाले आहेत



त्यामुळे सक्रिय रुग्णाची संख्या 26 हजार 240 इतकी झाली आहे



देशात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 479 झाली आहे



देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 65 हजार 122 लोक संसर्गमुक्त झाले आहेत




देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत