भारतीय सेनेच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली वार्षिक परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कारगिलला पोहोचले. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी येथे सैनिकांसोबत अमूल्य वेळ घालवत आहेत. गेल्या वर्षी पीएम मोदींनी जम्मूच्या नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. भारतीय सीमांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचे कौतुक करताना ते म्हणाले की हे सैनिक संरक्षण कवच आहेत, ज्यामुळे आपण सर्व भारतीय निर्भयपणे शांतपणे राहू शकतो. 2020 मध्ये पीएम मोदींनी राजस्थानमधील जैसलमेर येथील लोंगेवाला येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती तेथेही पंतप्रधानांनी सैनिकांच्या धैर्याचे आणि निष्ठेचे कौतुक करताना सांगितले की जोपर्यंत भारतीय सैनिक आहेत, तोपर्यंत या देशाची दिवाळी उत्साहात आणि निर्भयपणे साजरी होईल. PM मोदींची भारतीय सेनेच्या जवानांसोबत दिवाळी! पंतप्रधान, म्हणाले- 'सैनिकांचा आम्हाला अभिमान'