देशातील कोरोना संसर्गात चढ-उतार दिसतोय. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना पाहायला मिळत आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात 14 हजार 917 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे.



आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या 825 रुग्णांची वाढ झाली आहे.



याआधी म्हणजे शनिवारी 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे.



सध्या देशात 1 लाख 17 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. ही संख्या काल 1 लाख 16 हजारांवर होती.



देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता देशात 1 लाख 17 हजार 508 कोरोना रुग्ण आहेत.



शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 50 हजार 276 डोस देण्यात आले आहेत.



देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 7.52 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 4.65 टक्के आहे.



देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे.