देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज वाढ झाली आहे. आज देशात 1016 नवे रुग्णांची नोंद आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आज देशात 1016 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या 811 इतकी होती. या तुलनेनं आज 205 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.

देशातील कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13 हजारांवर आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.

भारतात गेल्या 24 तासांत एक हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

यासह देशातील कोरोना झालेल्या एकूण रुग्णांची संख्या चार कोटी 46 लाख 63 हजार 968 इतकी झाली आहे.

आतापर्यंत सुमारे साडे पाच लाख रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात एकूण 5 लाख 30 हजार 514 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सुमारे चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांत 130 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

सध्या महाराष्ट्रात 1320 सक्रिय रुग्ण आहेत, शिवाय दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.