देशातील कोरोना संसर्गात आज किंचित वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.



भारतात गेल्या 24 तासांत एक हजार 132 नवीन रुग्ण आढळले असून 14 कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यूची नोंद झाली आहे.



नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1132 रुग्णांची नोंद आणि 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 1082 नवीन कोरोनाबाधित आणि 12 रुग्णाचा मृत्यू झाला होता.



देशव्यापी लसीकरणात भारतात आतापर्यंत 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत.



कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 90 कोटीहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.



गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्ते सातत्याने घट पाहायला मिळत होती. पण आज मात्र कोरोना रुग्णसंख्या 50 ने वाढली आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन रुग्णांमुळे भारतातील कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 60 हजार 579 वर पोहोचला आहे.



यातील 4 कोटी 41 लाख 15 हजार 557 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.



गेल्या 24 तासांत 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.



यामुळे देशातील एकूण कोरोनामृतांचा आकडा 5 लाख 30 हजार 500 वर पोहोचला आहे.