जगभरातील शास्त्रज्ञांकडून कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असताना भारतात दिलासादायक बातमी समोर आली आहे.
देशात गेल्या 24 तासांत एक हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
आज भारतात 937 कोरोनाबाधित आढळले असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल ही संख्या जास्त होती. काल देशात 1132 नवे रुग्ण आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
दरम्यान याआधी 26 ऑक्टोबर रोजी देशातील कोरोना रुग्णांचा आलेख एक हजारांच्या खाली गेला होता. 26 ऑक्टोबरला 830 रुग्णांची नोंद झाली होती. सहा महिन्यांनंतर पहिल्यांदा कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक घट पाहायला मिळाली होती.
सध्या देशातील कोरोना विषाणूचा वेग मंदावल्याचं दिसत आहे. असं असलं तरी, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही.
महाराष्ट्रात 230 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार 560 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या देशात कोरोनावर उपचार घेत असलेले 14 हजार 515 रुग्ण आहेत. काल ही देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजार 839 होती.
एकूण कोरोनाबाधितांपैकी आजपर्यंत 5 लाख 30 हजार 509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.