कोरोना व्हायरस भारतातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत 188 कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.

नवीन कोरोना (कोविड-19) रुग्ण आढळल्यानंतर, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3,468 वर पोहोचली आहे.

मात्र, गेल्या 24 तासांत 141 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,43,483 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 91.01 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 1,34,995 चाचण्या झाल्या. त्याचवेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लोकांना एकूण 220.07 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.

सरकारच्या म्हणण्यानुसार, देशभरात गेल्या 24 तासांत कोरोना लसींचे 90,529 डोस लोकांना देण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गात दिलासा देणारी बाब म्हणजे देशात कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.8% आहे.

दिवसाला कोव्हिड पॉझिटीव्ह रूग्णांचा रेट 0.14% आहे आणि साप्ताहिक कोविड पॉझिटीव्ह रेट 0.18% आहे.