देशात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस झपाट्याने पसरत आहे. देशात सुमारे दोन हजार नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे. देशात आज 1805 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 1500 नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सातत्याने वाढत्या कोरोनाबाधितांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात सध्या 10 हजार 300 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. देशात गेल्या 24 तासांत 932 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. भारतात मागील 24 तासांत 1805 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.02 टक्के आहे. देशात आतापर्यंत 4,41,64,815 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. कोविड विषाणू संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी संसर्गाला लोक बळी पडत आहेत त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. H3N2 फ्लूच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे.