बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. शिबानीच्या वेडिंग आऊट फिटनं अनेकांचं लक्ष वेधलं. तिच्या वेडिंग लूकच्या खास गोष्टी जाणून घेऊयात क्रोसेट टॉप आणि स्कर्ट असा लूक शिबानीनं लग्नसोहळ्यासाठी केला होता. शिबानीचा हा रेड गाऊन हँड अँब्रॉयटरीनं तयार करण्यात आला आहे. शिबानीनं गोयनका इंडिया या कंपनीनं डिझाइन केलेले रूबी डँगलर्स इअरिंग्स घातले होते. शिबानीचे इअरिंग्स 218 कॅरेट सोन्यानं तयार करण्यात आले आहेत. शिबानीच्या इयरिंग्समध्ये 550 पेक्षा जास्त व्हाईट डायमंड आणि रोज कट डायमंड्सचा वापर देखील यामध्ये करण्यात आला आहेत.