स्वयंपाक करणं ही एक कला आहे. स्वयंपाक घरातील काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. सुकमेवा चॉप करताना तो काही तास फ्रिजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाड मीठ टाका फ्रिजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा. तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करा. स्वयंपाक घर कधीच नैऋत्य दिशेला नसावे. असं केल्यास गृहकलह निर्माण होतात.