भारताची दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास मीराबाईने कॉमनवेल्थ 2022 मध्ये मिळवलं सुवर्ण पदक कॉमनवेल्थमध्ये एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे मीराबाईने 49 किलो वजनी गटात मिळवलं पदक एकूण 201 किलोग्राम वजन उचलत मीराबाईनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली यावेळी मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 88 किलोग्राम वजन उचललं. 61 किलो वजनी गटात एकूण 269 किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवलं सर्वात आधी 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवलं मीराबाईने याआधी टोक्यो ऑलिम्पिकमध्येही रौप्यपदक मिळवलं होतं. संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.