भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने केला धक्कादायक खुलासा कॉमनवेल्थ खेळांत सहभागी होणाऱ्या लवलिनाने केले मोठे आरोप मानसिक छळ सुरु असल्याचं लवलिनाने म्हटलं आहे. लवलिनाने ट्वीटरवर पोस्ट करत ही सर्व माहिती दिली आहे. आपली प्रशिक्षक संध्या गुरुंगजीसह दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी विनंती करुनही उशिराने सोडलं जात असल्याचं म्हटलं आहे. या सर्वाचा माझ्या खेळावरही परिणाम होत आहे. असंही ती म्हटली आहे. स्पर्धेला 8 दिवस असताना असं सगळं होत असून याशिवाय माझ्या एका प्रशिक्षकाला भारतात पुन्हा पाठवण्यात आलं असंही तिने सांगितलं. अशात मी खेळावर कसं फोकस करु हे कळत नाही. पण आशा आहे या साऱ्यानंतरही मी देशासाठी पदक मिळवून देईन, असंही ती म्हणाली. बॉक्सर लवलिना बोर्गोहेन आणि बॉक्सर निखत जरीन भारताचं प्रतिनिधित्त्व करेल. लवलिनाच्या या आरोपावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे.