सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. मात्र, तरीही कमी पाऊस पडत असल्या कारणाने जास्त उन्हाळा जाणवतो.



अशा वेळी शरीराला हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं आहे.



नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात.



इतकेच नाही तर, नारळाच्या पाण्यात 94 टक्के पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते.



उष्णतेमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते, ज्याला नारळ पाणी वाढवण्यास मदत करते.



नारळ पाण्याच्या सेवनाने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. ज्यामुळे मधुमेहाची समस्या टाळता येते.



नारळाचे पाणी आरोग्यासाठी तर चांगले असतेच पण ते त्वचेसाठीही चांगले असते. ते त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.