हृदयरोगाच्या (Heart Attack) समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

हृदयरोगाच्या (Heart Attack) समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

बदलती जीवनशैली आणि सवयींमुळे अगदी तरुणवयातील व्यक्तींमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.

हे लक्षात घेऊन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हॉर्ट अटॅकचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे.

हृदयरोगाचे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्वपूर्ण चाचणी म्हणजे ईसीजी (ECG). मात्र गाव-खेड्यात ईसजी मशीन देखील उपलब्ध नसतात. 

अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत.

अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत.

त्यामुळे डॉ. गुरुनाथ परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे.

त्यामुळे डॉ. गुरुनाथ परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे.

हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ईसीजी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे.

सध्या बाजारात अनेक  उत्पादन असून ते फक्त हृदयाचे ठोके मोजणे किंवा अनियमितता दाखवणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. 

हार्ट अटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा 12 LEAD ECG फक्त या उपकरणाद्वारे शक्य असल्याचा दावा डॉ. परळे यांनी केला आहे.

अद्याप ही हे उपक्रम निर्मितीच्या प्रक्रियेत आहे. वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर हे उपकरण बाजारात येईल.