नाताळ या सणाला ख्रिसमस ट्री लावण्याची सुरुवात उत्तर युरोपपासून झाली. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी पाइनच्या झाडांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी ख्रिसमस ट्रीसाठी चेरीचे झाडही सजवले जाते. ख्रिसमसच्या दिवशी घरात ख्रिसमस ट्री लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस जगभर थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमस ट्री लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. ख्रिसमस ट्री ज्या घरामध्ये असतो,तिथेल लोक नेहमी एकत्र आणि आनंदात राहतात. प्राचीन काळात ख्रिसमस ट्रीला जीवनाच्या सातत्याचे प्रतीक मानले जायचे. ख्रिसमस ट्री सजवल्यास घरातील लहान-मोठ्या मुलांना चांगले आयुष्य लाभते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला ख्रिसमस ट्री ठेवणे शुभ मानले जाते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.