बर्फाचा वापर हा नैसर्गिकरित्या एखादी दुखापत भरून येण्यासाठी केला जातो.



मुकामार आणि सूज यांसारख्या समस्यांमध्ये बर्फाचा वापर केला जातो.



बर्फ कपड्याशिवाय त्वचेवर लावू नये, त्यामुळे आईस बर्न होऊ शकते.



बर्फ हातात घेतानाही कपड्याचा वापर करावा.



ज्या पाण्याने बर्फ बनतो, ते पाणी स्वच्छ आणि जंतुरहित असावे.



बर्फ कपड्यामध्ये गुंडाळून वेदनेच्या जागी शेकवा.



बर्फाचा मसाज करताना खूप जास्त वेळही त्वचेवर बर्फ फिरवू नये.



बर्फाचा मसाज करण्यासाठी वापरला जाणारा बर्फ साध्या पाण्यात बनवण्याऐवजी तुम्ही काकडीच्या रसामध्येही बनवू शकता.



चांगल्या परिणामांसाठी दिवसातून कमीतकमी २-३ वेळा बर्फाचा शेक घ्या.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.