लोकरीचे कपडे कधीही खूप जोर लावून पिळू नये.

लोकरीचे कपडे धुण्यासाठी लिक्विड डिटर्जंटचा वापर करावा.

थंडीच्या मोसमात वातावरणात आर्द्रता असल्यामुळे लोकरीचे कपडे सूर्यप्रकाशात ठेवावे.

लोकरीचे कपडे बॅगेत ठेवताना बॅगेमध्ये कडुलिंबाची पाने टाका.

लोकरीचे कपडे दररोज घातल्यावर ते नियमित सुकवावे त्यामुळे घामाचा ओलावा निघून जातो.

लोकरीचे कपडे धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.

लोकरीच्या कपड्यांना कधीही ब्रश लावू नका, ते हलक्या हाताने धुवा.

लोकरीचे कपडे चुकूनही वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये.

लोकरीचे कपडे सुटकेसमध्ये ठेवण्याआधी वर्तमानपत्रात गुंडाळावे.

लोकरीचे कपडे वापरताना प्रत्येक वापरानंतर या कपड्यांवर ‘ब्रिस्टल ब्रश’ फिरवावा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.