जून महिन्यात जगभरातील विठ्ठल भक्तांना विठ्ठल-रूक्माई भेटीचे वेध लागलेले असतात
आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर गोव्यात चिखल काला उत्सव साजरा केला जातो
चिखल काला म्हणजे कपडे काढून उघड्या अंगाने चिखलात अक्षरश: लोळणे.
यावेळी अनेक मनोरंजन करणारे अनेक खेळ खेळले जातात.
उत्तर गोव्यातील माशेल येथिल देवकी कृष्ण मंदीरात या चिखल काल्याचे आयोजन करण्यात आले होते.
एकमेकांच्या अंगावर चिखल उडवत विठुरायाच्या गजरात दंग होऊन चिखल काला आज खेळला जातो.
रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी असा जयघोष करत सर्व वयोगटातील पुरुष हा चिखलकाला खेळतात.
गोव्याचे असे अनेक सण आहेत जे फक्त गोव्यातच साजरे केले जातात.
चिखल काला हा असाच एक सण आहे. हा सण आषाढ महिन्याच्या 12 व्या दिवशी साजरा केला जातो.