वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसोबतच, प्रवाहाविरुद्धच्या विचारांसाठी विक्रांत मेस्सी ओळखला जातो
पण, याच बॉलिवूडच्या नामांकीत अभिनेत्यानं अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा केलीय
अभिनेत्यानं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत यासंर्भात खुलासा केला आहे.
विक्रांत मेस्सीच्या सोशल मीडिया पोस्टनंतर चाहत्यांना धक्का बसलाय.
नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्ष खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो., असं विक्रांत मेस्सी म्हणाला
विक्रांत म्हणाला की, जसजसा मी पुढे जातोय, तसतसं मला समजतं की, आता घरी जाण्याची वेळ आलीय. पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही...
त्यामुळे येत्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. , असं विक्रांत म्हणाला.
शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी, पुन्हा धन्यवाद, प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी राहीन., असं विक्रांत म्हणाला.
काही दिवसांपूर्वी आलेल्या 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटामुळे विक्रांत मेस्सी चर्चेत होता.
विक्रांतनं संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या निर्णयावर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली.