राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल 22 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता.

त्यामुळे त्यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी मणक्याची शस्त्रक्रिया झाली.

मुंबईच्या गिरगावातील प्रसिद्ध एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.

शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते.

यादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.