'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील शशांक म्हणजेच चेतन वडनेरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

चेतन वडनेरेने अभिनेत्री ऋजुता धारपबरोबर साखरपुडा उरकला आहे.

चेतन वडनेरे आणि ऋजुता धारपच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.

चेतन आणि ऋजुताने चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेतन सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तर ऋजुताची 'जाऊ नको दूर बाबा' ही मालिका सुरू आहे.

फुलपाखरू मालिकेच्या सेटवर चेतन आणि ऋजुताची भेट झाली.

मित्रमैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत चेतन व ऋजुताचा साखरपुडा पार पडला आहे.

चेतन-ऋजुताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चेतन-ऋजुताच्या फोटोंवर चाहते कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा देत आहेत.

साखरपुड्यानंतर चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहे.