फिफाच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे चर्चेत आहे. 'पठाण' सिनेमाच्या वादादरम्यान दीपिकाने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर दीपिकाचे फोटो व्हायरल होत आहेत. फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये दीपिकाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दीपिका फिफा विश्वचषकाचा एक भाग असल्याने प्रचंड आनंदी आहे. दीपिकाच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा आगामी 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'पठाण' सिनेमाची शाहरुख-दीपिकाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.