चांद्रयान-3 नं घरवापसी केली आहे.चांद्रयानचं प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं इतिहास रचला. यानंतर इस्रोकडून विविध प्रयोग आणि चाचणी करण्यात येत आहेत. ज्याआगामी चंद्रमोहिमांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 चा आणखी एक प्रयोग यशस्वी झाला आहे. चांद्रयान-3नं घरवापसी केली आहे. चांद्रयानचं प्रॉपल्शन मॉड्यूल लूनार ऑर्बिटमधून पृथ्वीच्या कक्षेत परतलं आहे. याद्वारे इस्रोनं सिद्ध केलं आहे की, भारत अंतराळात यान पाठवून ते पृथ्वीवर सुरक्षितरित्या आणू शकतो. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणानंतर प्रॉपल्शन मॉड्यूल आधी पृथ्वी आणि त्यानंतर चंद्राला प्रदक्षिणा घालत होतं. त्यातून लँडर आणि रोव्हर वेगळे झाले, जे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.