'चांद्रयान-3' साठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. 'चांद्रयान-3' सोबत पाठवलेले विक्रम लँडर व्यवस्थित आहे.
चांद्रयान योग्य पद्धतीने चंद्राच्या दिशेने जात आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने दिली आहे.
चांद्रयान-3 चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे.
चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. आता विक्रम लँडर हळूहळू त्याचा वेग कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जात आहे.
चांद्रयान-3 ने आज पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे.
मिशन मूनचा आणखी एक टप्पा पार करताना आज पहाटे 1.50 वाजता विक्रम लँडरचे यशस्वीरित्या डी-बूस्टिंग करण्यात आले.
म्हणजेच चांद्रयान-3 चा वेग कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळे चांद्रयान-3 आता चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर दूर आहे.
चांद्रयान-3 हे अंतराळयान 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं होतं.
चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.