आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचं शिक्षण किती? जाणून घ्या...



रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय यांचं शिक्षण किती याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, तर याचं उत्तर आज जाणून घ्या.



धीरूभाई अंबानी यांचे मोठे सुपुत्र मुकेश अंबानी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी संपत्तीच्या बाबतीत जगात 11 व्या क्रमांकावर आहेत.



नीता अंबानी यांचा विवाह मुकेश अंबानी यांच्याशी 1985 मध्ये झाला होता. त्या भरतनाट्यम शिक्षिकाही आहे.



नीता अंबानी यांनी कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी पूर्ण केली आहे. त्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिकाही आहेत.



आकाश अंबानी मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. आकाशने ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे.



आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे.















मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अनंत अंबानी पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.



मुकेश अंबानी याची होणारी धाकटी सून म्हणजे अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंट न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर आहे. ती भरतनाट्यम डान्सरही आहे.