ऑगस्ट महिना उजाडला तरी पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण फक्त दहा टक्केच भरले आहे.

गेल्या वर्षी हेच धरण 11 ऑगस्ट रोजी 98 टक्के भरलं होतं.

15 ऑगस्टपर्यंत हेच धरण 100 टक्के भरले होते.

यावर्षी मात्र हे धरण अद्यापही दहा टक्क्यावरच आहे.

उजनी धरणामध्ये सध्या 69.30 टीएमसी पाणीसाठा आहे.

उजनी धरणामध्ये 63.66 टीएमसी पाणीसाठ्याच्या वर पाणी येऊ लागलं की उजनी धरण हे प्लस मध्ये येतं.

63.66 टीएमसी पर्यंतचा पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून समजला जातो.

आता उजनी धरणामध्ये अधिकचा 5.64 टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे.

धरणक्षेत्रात पाऊस नाही आणि धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील पाऊस नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.