मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी' या सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. लहान मुलींपासून ते अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील 'चंद्रा' या गाण्यावर डान्स करत आहेत. आता कोल्हापुरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनी या गाण्यावर थिरकली आहे. हर्षदाला नृत्याची आवड असल्याने तिने 'चंद्रा' या गाण्यावर डान्स केला आहे. हर्षदाचा चंद्रा या गाण्यावरचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'चिमुकली चंद्रा', असं कॅप्शन देत अमृताने छोट्या चंद्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारी हर्षदा कांबळे ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडील्या अनुस्कुरा या दुर्गम भागात राहणारी विद्यार्थीनी आहे. हर्षदाला नृत्याची खूप आवड असून अभ्यासातदेखील ती खूप हुशार आहे. अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडलं लावलं आहे. चाहत्यांचे चंद्रा या लावणीवर थिरकतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.