दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सूर्याची गणना होते. सूर्याचा 2021 साली आलेला 'जय भीम' हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला. आता हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्या मुंबईत घर घेण्याचा विचार करत होता. आता सूर्याने नव्या आलिशान फ्लॅटसाठी 70 कोटी मोजले आहेत. सूर्याने घर घेतलेल्या इमारतीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणी मंडळींनीदेखील घर घेतलं आहे. सूर्या एका सिनेमासाठी तब्बल 20 ते 25 कोटी मानधन घेतो. सूर्याने 52 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सूर्या महिन्याला 1.5 कोटी कमवत असून त्याची एकूण संपत्ती 185 कोटी आहे. सूर्याचा 'सुरिया 42' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.