बॉलिवूडमध्ये सुंदर दिसणे हा अभिनेत्रींसाठी महत्त्वाचा निकष आहे. मात्र, या सुंदरतेमुळे चित्रपट गमवावे लागले असल्याची खंत अभिनेत्रीला आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने ही खंत व्यक्त केली. सौंदर्यामुळे चित्रपटात काम मिळाले नसल्याचे तिने सांगितले. एका मुलाखतीत दियाने आपली खदखद व्यक्त केली. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. मात्र, मी 'टू मेनस्ट्रीम लुक' असल्याचे सांगत अनेक दिग्दर्शकांनी नकार दिला. अनेक चांगले चित्रपट हातातून गेले असल्याची खंत दियाने व्यक्त केली. दिया मिर्झा आगामी 'भीड' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मिस इंडिया' स्पर्धा जिंकलेली दियाच्या चित्रपटांमधील अनेक भूमिका गाजल्या आहेत. दिया चित्रपटांसोबत पर्यावरण संरक्षणासाठीदेखील काम करते.