सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरु झाली आहे.

या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर संकल्पनेअंतर्गत सोने आणि चांदीचे काम करण्यात येत आहे.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भव्य असे झुंबर बसवण्यात आले आहे.

यामुळे मंदिराचे वैभव आणखीच खुलून दिसत आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला 900 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे.

या यात्रेच्या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धरामेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात.

मुख्य यात्रेची सुरुवात शुक्रवारपासून (13 जानेवारी) होणार आहे.

शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा मानाच्या पहिल्या दोन नंदीध्वजांची पूजा होऊन यात्रेला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो.