फ्लॉवर खाल्ल्याने मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालते तसेच आपली स्मरणशक्ती वाढते.
रक्त शुद्ध होण्यासाठी कच्चा फ्लॉवर खाणे आरोग्यास उत्तम ठरते.
फ्लॉवरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि लठ्ठपणा कमी होऊन, वजन नियंत्रणात राहते.
फ्लॉवरच्या भाजीमुळे सांधेदुखी कमी होते आणि हाडे मजबूत राहतात.
फ्लॉवरमधील 'व्हिटॅमिन सी' असते, त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे नियमितपणे फ्लॉवरचे सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत होते.
फ्लॉवर खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, किडनी स्टोन इ. विविध आजारांचा धोका कमी होतो.
फ्लॉवरमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
फ्लॉवर खाल्ल्यामुळे शरीरातील पेशींचे कार्य मजबूत राहते.
फ्लॉवरमध्ये आढळणारे 'व्हिटॅमिन सी'मुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो.