मिठाच्या कोमट पाण्यात पाय टाकून बसा.
पायात जळजळ आणि खाज येत असेल तर हळद आणि खोबरेल तेल एकत्र लावल्याने आराम मिळतो.
शरीरात विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने तळवे दुखतात आणि जळजळ होते ,त्यामुळे रोज भरपूर पाणी प्यावे.
खोबरेल तेल आणि देशी कापूर एकत्र करावे आणि हे मिश्रण पायांच्या तळव्यावर लावा,त्यामुळे पायाला थंडावा जाणवेल.
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे पायांची जळजळ दूर करण्यासाठी मदत होते.
जास्त प्रमाणात पायांना खाज येत असेल तर कोरफडीचा गर पायांना लावावा.
तळव्यांना खाज येत असेल तर दह्याने तळव्यांना मसाज करा.
बर्फाच्या पाण्यात १०-१५ मिनिटे पाय ठेवल्याने तळपायाची आग कमी होते.
तळव्यांना जळजळ आणि खाज येत असेल तर लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट पायांवर लावावी.
निलगिरीच्या तेलानं पायांना मसाज केल्यास पायांना थंडावा मिळतो.