हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी लोकरीचे कपडे घातले जातात.

थंडीच्या दिवसात वापरल्या जाणाऱ्या टोप्या या आकर्षक असतात.

या टोप्यांवर पॉम-पॉम (गोंडा) लावतात.

टोप्यांवर गोंडा लावण्याची परंपरा खूप जुनी आहे.

विविध फुलांचे आकार कापून त्यांची टोपीवर सजावट करण्याची प्रथा वायकिंग काळापासून सुरू असल्याचं मानलं जातं.

असे मानले जाते की, फ्रेयर नावाची देवता आपल्या डोक्यावर पॉम-पॉम असलेलं संरक्षण कवच परिधान करत असे.

असे म्हणतात की, युरोपीय देशांमध्ये टोप्यांवरच्या पॉम-पॉमचा रंग त्या व्यक्तींचे रॅंक दर्शवतो.

असेही मत आहे की, अशी पॉम-पॉम असलेली टोपी एक प्रकारचं सुरक्षा कवच मानली जाते.

लष्करातल्या व्यक्तीदेखील पॉम-पॉम असलेली टोपी संरक्षणाच्या हेतूने घालतात.

पॉम-पॉम ही केवळ सजावट नाही तर त्यामागे संरक्षण हा हेतू आहे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.