कमी प्रीमियम दरात चांगला विमा खरेदी करण्याकडे कटाक्ष असतो काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या कारचा प्रीमियम कमी होऊ शकतो तुम्ही एका वर्षात विमा पॉलिसी क्लेम केला नाही तर तुम्हाला No Claim Bonus चा फायदा मिळू शकतो. पहिल्या वर्षी तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत हा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही दरवर्षी 5000 रुपयांचा प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला No Claim Bonus म्हणून 1000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. कारचा वापर कमी प्रमाणात करतात त्यांच्यासाठी Pay As You Drive हा विमा चांगला ठरू शकतो. यामुळे तुम्हाला कमी प्रीमियम द्यावा लागू शकतो. Pay As You Drive या प्रकाराचा विमा तुम्ही किती किलोमीटर कार चालवता यावर अवलंबून आहे. ज्या कार 15 हजार किलोमीटरपेक्षा कमी धावल्या आहेत. त्यांना याचा फायदा मिळतो. वेळेत विमा नुतनीकरण न केल्यास तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो. कारच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर विमा दावा करणे टाळावे. कमी खर्च असणारे विमा दावा केल्याने तुम्हाला No Claim Bonus चा लाभ मिळणार नाही.