ब्रिटिश वंशाची भारतीय अभिनेत्री एमी जॅक्सन आपल्या ग्लॅमरस लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. एमी जॅक्शननं बॉलिवूड व्यतिरिक्त दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. एमी जॅक्सननं कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हल रेड कार्पेटवर एमी जॅक्सननं आपल्या अदांनी सर्वांनाच घायाळ केलं. कान्सच्या रेड कार्पेटवर एमीनं ब्लॅक कलरचा गाऊन वेअर केला होता. ब्लॅक गाऊनमध्ये एमी खरंच एखाद्या परीप्रमाणे सुंदर दिसत होती. ब्लॅक गाऊनसोबत एमीनं चोपार्ड डायमंड ज्वेलरी कॅरी केली होती. एमी जॅक्शन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीचे तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.