आपल्यापैकी अनेकांना बीट खायला आवडत नाही. बीटमध्ये अनेक पोषक तत्व असतात. हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येवर बीटचे सेवन फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला बीटचा जास्तीत जास्त पोषक तत्व हवे असतील तर, तुम्ही रिकाम्या पोटी बीटचा ज्यूस पिऊ शकता. बीट वापरण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही बीटापासून बनवलेला पराठा खाऊ शकता. यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल. तुम्ही बीट सॅलडमध्ये देखील मिक्स करून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला अनेक जीवनसत्त्व मिळतील. बीटरूट थंड कंदमूळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त बीट खाणे चांगले ठरते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.