सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान आपल्या लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच साराने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये सारा खूप सुंदर दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. स्टार किड असूनही तिने आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारा विक्रांत मेस्सीसोबत दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. साराचा 'अतरंगी रे' 24 डिसेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. अतरंगी रे या चित्रपटातील 'चका चक' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. साराचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.