आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे.
धोनीनं एकूण सहावेळा आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. दरम्यान, डेव्हिड मिलरनं मंगळवारी खेळण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पाचव्यांदा अशी कामगिरी केली.
या कामगिरीसह त्यानं रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डसारख्या दिग्गजांचा विक्रम मोडला आहे. तर, रवींद्र जडेजाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. डेव्हिड मिलरचं आता धोनीचं विक्रम मोडण्याकडं लक्ष्य असेल.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला.
या सामन्यात गुजरात टायटन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारून डेव्हिड मिलरनं गुजरातला विजय मिळवून दिला.
यंदाच्या हंगाम गुजरातचा फलंदाज डेव्हिड मिलरसाठी चांगला ठरला आहे.
या हंगामात 15 सामन्यात 64.14 च्या सरासरीनं आणि 141.19 च्या स्ट्राईक रेटनं 449 धावा केल्या आहेत.
या हंगामात दोन वेळा डेव्हिड वार्नरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. या हंगामात त्यानं एकूण 22 षटकार मारले आहेत.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत नवव्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात डेव्हिड वार्नर कशी कामगिरी बजावतो? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.